Jiva Mahale Bodyguard of Shivaji Maharaj

जिवा महालेची वंशावळ…

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवा महाले यांनी बडा सय्यिद याला ठार मारले हे शिवभारत आणि इतर काही साधनांन मध्ये आले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाले यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले. ते जातीने न्हावी असून
सध्या त्यांनी “सकपाळ” असे उपनाव धारण केले आहे. त्यांच्याकडून मिळालेली 3 पत्रे श्री.पटवर्धन यांनी BISMच्या पाचव्या संमेलनात प्रस्तुत केली. यानंतर श्री.द.व.पोतदार यांना निगडे येथील रायरीकर जोशी यांच्याकडे एक पत्र आणि जिवा महालेची वंशावळ मिळाली. ती दिन्ही पत्र ऐतिहासीक साहित्य खंड 3 मध्ये प्रकाशित
केली. अफजल प्रसंगी जिवा महालेचे वय 25च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो.
वंशावळ – जिवा महालेचा मोठा भाऊ हा तान (तानाजी) महाले असावा. जिवा महालेचा मुलगा सीताराम; सीतारामचा मुलगा (सुभानजी); सुभानजीचे (नवलोजी व काळोजी); नवलोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी. अशी माहिती त्या वंशावळीत आहे.
हरी आणि सुभानजी हे जिवा महालेचे खापरपणतु.
.
छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी यांनी 15 डिसें 1702 मध्ये लिहील्या एका पत्रात “संताजी माहाला यांनी हुजूर येऊन विदित केले की मौजे जोर व गोळेगाव व गुळुंब, तर्फ मजकूर…” असा उल्लेख आला आहे.
.
छत्रपती शाहु महाराजांनी 7 डिसें 1709 मध्ये लिहीलेल्या पत्रात “तान महाले आणि जिवा महाले मर्दने हे पुरातन येकनिष्ट , स्वामिसनिध येकनिष्टपणे सेवा केली याकरीता खेडेबारे तरफेतील निगडे हे गाव त्यांना इनाम दिले आहे , ते त्यांच्याकडे वंशपरंपरेने चालवावे”असा हुकूम दिला आहे.
.
1732 मध्ये शाहू महाराजांचे पत्र मल्हारजी बीन सुभानजी व सीताराम बीन जिवा महाले यांना दिलेले इनामपत्र. यात सुभाजी मयण पावला म्हणून इनाम गाव मल्हारजीकडे चालू राहिल असे नमूद केले आहे. .

संदर्भ – श्री राजा शिव छत्रपती, श्री गजानन मेहेंदळे, खंड 1 , भाग 2, पुस्तक दुसरे

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Sanjivani Machi of Rajgad Fort

संजीवनी माची

दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार…. संजीवनी माची… !

संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकूण ३ टप्प्यात विभागली आहे. मध्ये – मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात. आता पुढे गेलो कि एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपरयामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागून एक खोली आहे. म्हणजे वरून उघडी पण चारही बाजूनी बंद अशी. आता नेमकं प्रयोजन माहित नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची( तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणून बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे.असो..आम्ही उजव्या हाताच्या दरवाज्याने पुढे निघालो. माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजूस असते. उजवीकडच्या जंग्यानमध्ये लक्ष्यपूर्वक बघावे.(जंग्या- शत्रूवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणून तटबंदीमध्ये असलेली भोके ) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्प्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रूने ताब्यात घेतला तरी बारकुश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रूचे जास्तीत जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे.
आम्ही आता अजून पुढे निघालो.दोन्ही बाजूला उतरती तटबंदी होती. काही वेळातच दुसऱ्या टप्प्याच्या बुरुजापाशी पोहोचलो. ह्याला ‘व्याघ्रप्रमुख’ म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्प्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच कि तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा ‘आळू दरवाजा’. इंग्रजी ‘ s ‘ आकाराप्रमाणे वक्राकार असणार्या तटबंदीमुळे आळू दरवाजाच्या बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. सकाळपासून दुर्गबांधणी मधले एक=एक अविष्कार पाहून आम्ही पुरते भारावलो होतो. आमच्या कडून भन्नाट रे…सहीच…मानला रे…अश्या कमेंट्स येत होत्या. पण आम्हाला कुठे ठाऊक होते कि ह्यापुढे अजून जबरदस्त अशी दुर्गरचना आपल्याला बघायला मिळणार आहे.
‘दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार’ -

संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे ‘दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार’. दोन्ही बाजूस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकारीत्याखाली उतरणारे दोन्ही बाजूस ३-३ असे एकूण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम , ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल. मागे कधीतरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडला जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला तर जिब्राल्टरनंतर दुसरी क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट किल्ला असे पारितोषक मिळाले. मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणूनच या ठिकाणीची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे. दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली कि बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटर भर जाड आहे. तिसऱ्या टप्प्यामाधली दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी ‘s ‘ आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्प्याटप्प्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेले कि खालचा बुरुज.
खालच्या बुरूजामध्ये उतरणाऱ्या पायरयानसाठी दरवाज्यामधून प्रवेश केला कि डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकार मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफसफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टोर्च घेऊन जावे. आम्ही थोडा उजेड बघून अश्याच एका बुरुजामध्ये खालपर्यंत उतरलो. उतरताना लक्ष्यात आले कि पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकार. जेव्हा पूर्ण उतरून गेलो तेव्हा खालच्या बुरुजाकडे बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फूट – दीड फूट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे घसपटत-घसपटत जावे लागत होते. हुश्श .. एकदाचे तिकडून बाहेर पडलो आणि खालच्या बुरुजावर निघालो. आता आम्ही दुहेरी तटबंदीच्या सुद्धा बाहेर होतो. कसली भन्नाट दुर्गरचना आहे हि.

भन्नाट दुर्गरचना -

शत्रूने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून – घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार…अगदी आत आलोच तरी लगेच वक्राकार आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रू पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रू सैन्याला पर्याय राहतो तो फक्त उजवीकडे किंवा डावीकडे जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकार जागेमध्ये शिरायचा. आत ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरून आपण गरम तेल, पाणी, बाण, भले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्यूच.
आम्ही पुन्हा पायऱ्याचढून आतमध्ये आलो आणि शेवटच्या बुरूजाकडे निघालो. अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. अखेर पूर्ण माची बघून आम्ही टोकाला चिलखती बुरूजाकडे पोहोचलो.६ वाजत होते. डाव्या बाजूस अथांग येसाजी कंक जलाशय होता. तर उजव्या हाताला दूरवर तोरणा उभा होता.त्यास मनात म्हटलेच…’उद्या येतोय रे तुझ्याकडे’. काहीवेळ तिकडेच बसलो. मागे दूरवर बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. आज राजगड बघून आम्ही भरून पावलो होतो.खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे ..

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Shivaji Maharaj Currency and Coins

छत्रपति शिवाजी महाराजांची नाणी

शालिवाहन शके १५९६, आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी (६जून १६७४ इ.स.) ये दिवशी हा महाराष्ट्राचा राजा सिंहासनाधिष्ठित चक्रवर्ती नृपति झाला. येणेप्रमाणे राजे सिंहासनारुढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा ‘मऱ्हाटा पातशाहा’ येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. शिवरायांचा निकटतम आदयं चरित्रकार कृष्णाजी अनंत ‘सभासद’ हिरेपारखी यांचे वरील वर्णन महाराजांच्या देदीप्यमान, अतुलनीय अशा राजाभिषेक सोहळयाची यथोचित माहिती देते. ज्याप्रमाणे महाराजांची प्रत्येक कृती अदभूत व असामान्य होती तद्वत त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची ‘नाणी’ ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.

बिंदूमय वर्तुळात एका बाजूला तीन ओळीत ‘श्री राजा शिव’ व दुसऱ्या बाजूस दोन ओळीत ‘छत्रपति’ असे महाराजांच्या नाण्याचे सर्वसाधारण स्वरुप होते. तसेच या मजकूराबरोबर सूर्य, चंद्र, बेलाचे पान, पिंडी, त्रिशूळ अशी काही चिन्हे ही त्या नाण्यांवर छापलेली असायची. शिवराईच्या अशा जवळपास दीडशेच्या वर वैविध्यपूर्ण आवृत्त्या मिळतात. राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby. (Ref. English Records on Shivaji (१६५९-१६८२), Letter no. ४८०, Page – ३६३)’

औरंगजेबाच्या चरित्रकार खाफीखान तसेच ग्रँट डफ म्हणतात, शिवाजीने १६६४ मध्ये म्हणजे शहाजी राजांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूनंतर ‘राजा’ हा किताब धारण केला व स्वत:ची नाणी पाडण्यास सुरुवात केली, मात्र हे ग्राह्य धरल्यास नाण्याच्या मागील बाजूस (ध्दङ्ढध्ङ्ढध्दद्मङ्ढ) ‘छत्रपति’ हे शब्दं कसे येतील? कारण अभिषिक्तं राजाच हे शब्दं वापरु शकेल आणि शिवरायांचा राजाभिषेक १६७४ मध्ये झाला. त्या समयी त्यांनी ‘छत्रपति’ हा किताब धारण केला. म्हणून खाफीखानाचे म्हणणे ग्राह्य धरण्यास अडचण येते.

मात्र शिवराई तसेच होन यांवर मूल्यदर्शक उल्लेख (फेस व्हॅल्यू)े वर्ष (मिंटिंग ईयर), कोठे पाडले याचा उल्लेख (ंमिंट-टांकसाळीचे ठिकाण) इ. बाबी छापलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ धातूवरुन त्याचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते. गेल्या शतकात देखील शिवराई हे नाणे पुणे व इतर भागात वापरत होते असा स्पष्ट उल्लेख दत्तो वामन पोतदार यांनी केला आहे. गेली दोन-तीन वर्षे शिवराई मुंबईतही बऱ्यापेैकी उपलब्ध होती (संग्राहकांसाठी) पण आता ती क्वचितच मिळते. महाराजांचे सोन्याचे होन हे मात्रं खूपच दुर्मिळ नाणे आहे. आज हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होन शिल्लक आहेत. तरीही काही संशोधक तसेच अभ्यासक महाराज राज्याभिषेकाआधी नाणी पाडत असावेत असे अजून समजतात. मात्र हेन्री ऑक्झिंडेनचे वरील पत्रं साऱ्या गोष्टी स्पष्ट करणारे आहे.

शिवाजी महाराजांना आपल्या हिंदू धर्माचा रास्त आभिमान होता. त्यांनी आपल्या नाण्यांवरील लिपी ही देवनागरी ठेवली तसेच मोगलांप्रमाणे सोन्याच्या मोहोरा न पाडता विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवर सोन्याचे २.७२८ ग्राम वजनाचे होन पाडले. मराठी भाषेत शिरलेल्या ‘फारसी’ (पर्शियन) शब्दांना संस्कृत प्रतिशब्दं, देवनागरी भाषेतील नाणी व चक्रवर्ती राजाप्रमाणे राजाभिषेकाद्वारे धारण केलेले छत्रपतिपद यांवरून महाराजांना स्वधर्म, स्वभाषा व स्वराज्य या गोष्टींचा निस्सीम अभिमान होता हे दिसून येते. महाराजांनी तांब्याच्या व सोन्याच्या नाण्याप्रमाणे चांदीची नाणी का पाडली नाहीत याचा उलगडा होत नाही. नाही म्हणायला ‘श्री जगदंबा प्रसन्न’ असे लिहिलेले एक नाणे उपलब्ध झाले आहे. मात्र ते शिवाजी महाराजांनी पाडले असे ग्राह्य धरण्यास कोणताही आधार नाही. जर तांबे व सोन्याच्या नाण्यांवर श्री राजा शिव छत्रपति ही अक्षरे / मजकूर असेल तर तोच न्याय चांदीच्या नाण्यास का नसावा? मात्रं गुजरातमधील एका व्यापाऱ्याकडे चांदीची शिवराई असल्याचा उल्लेख श्री. पद्माकर प्रभुणे यांनी एके ठिकाणी केला आहे.

इतिहासातील उल्लेखांस पुरावा जरी अत्यावश्यक असलाच तरी केवळ पुरावा नसल्याने एखाद्या गोष्टीची शक्यता नाकारणे हे ही तितकेसे योग्य नव्हे. मात्र छत्रपतिंचे नाव घेताच डोळया समोर येणारी नाणी म्हणजे होन आणि शिवराई. हिलाच रुका, तांबडा छत्रपति अशी ही अन्य संबोधने आहेत.

तांब्याच्या या शिवराई पैश्याचे वजन साधारणत: १२ ते १४ ग्राम इतके असते, व तिचा व्यास २.५ सेंमी इतका असतो. शिवराई पैसा तसेच सोन्याचा होन हे हाती पाडले जायचे. एका बाजूची डाय (आवृत्ती) खाली, मध्ये तांब्याची पट्टी व त्यावर दुसऱ्या बाजूच्या पंचिंग रॉड किंवा हातोडयाने (ज्यावर उलटी / अक्षरे असायची) घाव घातला जायचा. त्यामुळे नाण्यावरील लिपी / लिखाण हे बरेचदा आजूबाजूला सरकलेले दिसते. या पध्दतीने पाडलेल्या नाण्यास क्रूड कॉईन्स असे म्हणतात. त्यामुळे ही नाणी साधारणत: ओबड धोबड स्वरुपात दिसतात. सह्याद्रीच्या मुलुखाप्रमाणे. सोन्याचे होन पाडण्याची पध्दतही हीच होती. मात्र त्याची डाय वेगळी असायची. कारण होनाचा व्यास १.३ सेमी इतका असायचा. बाकी मजकूर, नाण्याच्या कडेभोवती (कॉलर) बिंदूयुक्त वर्तुळ ह्या अन्य बाबी समान होत्या.

स्वभाषेत पाडलेल्या या क्रांतीकारी नाण्यांची परंपरा महाराजांनंतर छत्रपति संभाजी महाराज, छत्रपति राजाराम महाराज, तसेच छत्रपति शाहू (थोरले) महाराज यांच्या कालावधीत सुरु होती. मात्रं शाहू महाराजांच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्थानात पसरवण्यास सुरुवात केली. थेट अटकेपर्यंत मराठा सैन्याने राघोबादादांच्या नेतृत्वाखाली धडक मारली. त्यामुळे पेशवे व त्यांचे आधारस्तंभ असणाऱ्या शिंदे, होळकर, पवार, गायकवाड आदि संस्थानिक सरदारांना स्थानिक भाषेचा (पर्शियिन) आधार घ्यावा लागला. कारण इंदौर, धार, देवास, ग्वाल्हेर, बडोदा, कटक (रघुजी भोसले – नागपूरकर) असे सर्वत्र मराठा साम्राज्य विस्तारले होते. दिल्लीला कोण बादशाहा बसणार हे सुध्दा मराठेच ठरवित. आज ऐकायला नवल वाटेल की, सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर तसेच मुलतान या शहरांवर काही काळ मराठयांचा ताबा होता व त्यांच्या तेथे टांकसाळी (मिंटस्-नाणी पाडण्याची जागा) सुध्दा होत्या. छत्रपति शिवरायांनी जनतेला स्वत:च्या तेजाने पुन्हा जागृत केले. त्यांना स्वधर्म,स्वभाषा व स्वराज्य यासाठी लढा देण्यास शिकवले. त्यासाठी स्वभाषेतील नाणी पाडली, संस्कृत प्रतिशब्दांचा कोष (डिक्शनरी) तयार केली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘स्वत्वाची’ जाणीव करुन दिली

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Fort Pratapgad

किल्ल्याचे नाव – प्रतापगड किल्ला

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची : 3556 फुट
डोंगररांग: महाबळेश्वर
श्रेणी : सोपी
जिल्हा – सातारा

‘‘महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात’’ शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ‘‘प्रतापगड‘‘. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. ह्या सुप्रसिध्द घटनेमुळे व महाबळेश्वरच्या सानिध्यामुळे सर्वांना माहीती असलेला हा किल्ला आजही सुस्थित उभा आहे.

इतिहास : १६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी ‘जावळी‘ ताब्यात घेतली. जावळीच्या खोर्‍यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ‘‘भोरप्या डोंगर‘‘ एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. ह्या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड. प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली.

इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्‍यात आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाजता शिवरायांनी अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली.
इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.

पहाण्याची ठिकाणे : प्रतापगडाच्या दक्षिणेस असलेल्या टेहाळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे. ह्या बुरुजाखालून असलेल्या वाटेने गडावर जाताना उजव्या बाजूच्या तटबंदीत विविध पातळीवर जंग्यांची रचना केलेली दिसते. ह्या रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. ह्याच मार्गाने काही पायर्‍या चढून गेल्यावर आपण तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमूख महाद्वारापाशी येतो. ह्या महाद्वाराची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असलेल्या महाद्वारामुळे हत्तीं किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. ह्यातील उजव्या हाताच्या देवडीत एक प्रचंड तोफ आहे. महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूची वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. हीच ती प्रतापगडाच्या सर्व छबींमध्ये दिसणारी प्रतापगडाची माची. ह्या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. बुरुजावरुन उजव्याबाजूस अफजलखानाची कबर व पाठीमागच्याबाजूस आडवा पसरलेला प्रतापगडाचा बालेकिल्ला दिसतो. महाद्वारातून बाहेर पडल्यावर पायर्‍यांच्या वाटेने गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. ह्या वाटेने जाताना डाव्या हाताला सध्या वापरात नसलेली वाट व दूसरा आणि तिसरा दरवाजा दिसतो.

श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. मंदिरातील महिषासूरमर्दिनीच्या रुपातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरुन आणलेल्या खास शिळेमधून घडवलेली आहे. मंदिरात स्फटीकाचे शिवलिंग आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या स्नानाचे तळे(नैऋत्य तलाव) व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.

श्रीभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. ह्या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र असलेली राजपहार्‍यांची दिंडी, कडेलोट, सूर्यबुरुज इत्यादी ठिकाणे आहेत.

पोहोचण्याच्या वाटा : महाराष्ट्रातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथून खाजगी वहानाने किंवा बसने ४० मिनीटात प्रतापगडाच्या पायथ्याशी जाता येते. याखेरीज मुंबई – गोवा महामार्गावरील पोलादपूरहून आंबेनळी घाटाने प्रतापगडावर जाता येते.

राहाण्याची सोय : गडावरील विश्रामगृहात रहाण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : गडावर जेवणासाठी अनेक उपहारगृह आहेत.

पाण्याची सोय : बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Fort Ajinkyatara

किल्ल्याचे नाव : अजिंक्यतारा

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची : 950
डोंगररांग: बामणोली, सातारा
श्रेणी : मध्यम
जिल्हा : सातारा

अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्षी, सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो.

इतिहास : सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्‍याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्‍याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणार्‍या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा.

ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्‍या शाहुच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Kanhoji Angre

कान्होजी आंग्रे
कान्होजी आंग्रे सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले ‘मराठी आरमार प्रमुख’! स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी, पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला. कालोसे गावातील आंगरवाडी ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले.कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. इ.सन १६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्‍या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून त्यांनी आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली.

छत्रपती राजारामांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकविण्याची जबाबदारी कान्होजींवर आली होती. अनुभवाने आणि मुत्सद्देगिरीने ते शत्रूला तोंड देत होते. त्यांची स्वतंत्र कामगिरी पाहूनच राजारामांनी त्यांना ‘सरखेल’ हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्‍याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावा लागत होता. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे संचारकरणार्‍या परकीयांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरचअनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्‍यावर एक दबदबा निर्माण केला होता.

कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूर सरदारांचे योगदान होते. कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक.

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Shivkalin Ashtapradhan Mandal

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ

शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते.

याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत.
राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.

पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍यांकडूनलिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.

पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडूनआलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | 1 Comment

guerrilla warfare tactics

” गनिमीकावा” म्हणजे काय?

शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी ‘गनिमी कावा’ या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे। ‘गनीम’ हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू ‘गनिमी’ हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. ‘कावा’ या शब्दाला लक्षणेने ‘फसवणूक’, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि ‘शत्रुचा कपटयुक्त हल्ला’ अथवा ‘कपट-युद्ध’ असा ‘गनिमी कावा’ या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्‍न असा उद्‍भवतो की ‘शत्रूचा कपटयुक्त हल्ला’ या शब्दाप्रयोगात शत्रू कोण?

मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो। म्हणजे ‘गनिमी कावा’ ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख ‘गनिमी कावा’ असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!

मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख ‘गनिमी कावा’ या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ। मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, ‘आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!” ‘गनिमी कावा’ हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.

‘धूर्तपणा’, ‘कपट’, ‘कावेबाजपणा’ अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ ‘कावा’ या शब्दाला प्राप्त झालेले आहेत। कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्‍या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून ‘कावा’ या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

‘महराष्ट्र शब्दकोशा’त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत। त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. ‘कावा’ या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे’. ‘गनिमी काव्या’च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.

कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाशी संबंधित आहे। पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्‍या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते। तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो। मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने ‘काव्या’चे होते. भरवेगात धावणार्‍या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच ‘कावा’. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस ‘गनिमी कावा’ हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने ‘गनिमी कावा’ वा केवळ ‘कावा’ या शब्दास लक्षणेने ‘कपट’, फसवणूक’ यांसारखे अर्थ प्राप्त झाले.

 

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Mahadaji Shinde

महादजी शिंदे

मराठ्यांच्या तलवारीचा धाक ज्यांनी उत्तरेत पेशव्यांपेक्षा जास्त बसवला त्या महादजी शिंदेना आमचा सादर प्रणाम.

१२ एप्रिल १७३० मध्ये जन्मलेल्या महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कतुर्त्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना ‘द ग्रेट मराठा’ असे म्हटले जाते. पानिपतची लढाई, वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले. १७९४ मध्ये त्यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यात वानवडी येथे त्यांची समाधी ‘शिंदे छत्री’ म्हणुन प्रसिद्ध आहे.

तर चला ह्या महायोद्ध्याबाबत माहीती घेऊया ह्या धाग्यावर…..

महादजी शिंदेंचे पूर्वज एका नावाजलेल्या क्षत्रिय कुळातील होते.शेंद्रक हे त्यांचे मूळ आडनाव.विजयनगरचे साम्राज्या उध्वस्त झाल्यावर आलेल्या बहामनी सुलतानांच्या काळात आपल्या तलवारीने त्यांनी पुष्कळ पराक्रम गाजवला होता..या काळातच त्यांच्या आडनावाचा पहिला अपभ्रंश झाला तो म्हणजे शिंदे..नंतरच्या काळात त्यांना सातार्‍यामध्ये कनबरखेड येथे( सांप्रतचे कण्हेरखेड) इथे पाटीलकी मिळाली होती..औरंगजेबाच्या सैन्यातही शिंदें मनसबदार होते..त्याच शिंदेंच्या कुळात जन्माला आले राणोजी शिंदे..राणोजी शिंदे हे बाजीराव पेशवे यांचे मित्र होते..

नंतर बाजीराभांनी त्यांना सैन्यात सामील केले..राणोजींनीही शिंद्यांच्या कर्तृत्वाला साजेशी कामगिरी केली..त्यांच्यामुळे माळवा मराठ्यांच्या ताब्यात आला..माळव्यावर मराठ्यांचे निर्विवाद वर्चस्व झाल्याने..बाजीरावांनी राणोजींना माळव्यात ३० टक्के चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार दिले..राणोजी शिंदे यांनी प्रथम उज्जयिनी (सांप्रत उज्जैन) व त्यानंतर ग्वाल्हेर इथे आपली राजधानी स्थापली..आणि आजूबाजूचा परीसर आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला..आजच्या मध्यप्रदेशातील मोठ्या भूभागावर एकेकाळी मराठयांचे साम्राज्य होते..राणोजी शिंदेंना पाच मुले होती जयाप्पा, दत्ताजी, जोतिबा, तुकाजी आणि महादजी..ह्यांच्यापैकी जयाप्पा ,दत्ताजी आणि महादजींनी मराठा साम्राज्याचा विस्तारात महत्वाची भूमिका बजावली…

रियासतकारांनी महादजी शिंदे यांविषयी म्हटले आहे कि शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि महादजी शिंदेनी तिच्यावर कळस चढवला

महादजींची लष्करी प्रतिमा नेपोलीयानाहून कमी नव्हती ..नेपोलियन एका लष्करी साम्राज्याचा एका बलाढ्य देशाचा प्रमुख होता. महादाजींकडे यांपैकी काहीच नव्हते ..त्याना आयुष्यभर स्वकीयांच्या विरोधास सामोरे जावे लागले तो विरोध मोडून काढून त्याना त्यांचा मार्ग काढावा लागला..त्यांनी जिंकलेला प्रदेश नेपोलीयानाने जिंकलेल्या परदेशाहून वेगळा नव्हता… महादजी जर युरोपात जन्माला आले असते तर त्यांची प्रतिमा नेपोलियनहून थोर झाली असती..त्यांच्या अलौकिक कारकिर्दीचे वर्णन करणारी कित्येक पुस्तके लिहिली गेली असती…महादजी शिंदेंचा आंग्ल चरित्रकार कीन याने त्याना अठराव्या शतकात आशिया खंडात होऊन गेलेला सर्वात मोठा पुरुष म्हणून संबोधले आहे…आपल्या देशाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे ह्या महान लष्करी नेत्याच्या आणि थोर मुत्साद्द्याच्या जीवनावर विशेष साहित्य उपलब्ध नाही…महादाजींच्या शंभराव्या पुण्यतिथी दिनी बेळगावचे नातू प्रकाशित केलेले चरित्र यांनी लिहिलेले चरित्र हे मराठी साहित्यातील महादजींचे एकमेव चरित्र आहे…

पानापाताच्या लढाईत महाराष्ट्राची एक संपूर्ण पिढी गारद झाली ..महाराष्ट्रात एक लक्ष बांगड्या फुटल्या ..पण शिंदे घराण्याला या लढाईचा जबरदस्त तडाखा बसला …
महादजी शिंदे यांचे एक बंधू तुकोजी आणि पुतण्या जनकोजी हे दोघे पानिपतावर गेले …बंधू दत्ताजी शिंदे हे अगोदर नजीबाच्या कट कारस्थानाला बळी पडले होते..आणि वडील बंधू जयाप्पा राजपुतांकडून दगाबाजीने मारले गेले होते..नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली आणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली..आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले..नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला ..

महादजींनी मराठ्यांच्या इतर शत्रुनासुद्धा चांगलेच वठणीवर आणले..दिल्लीच्या बादशाहाला नामधारी बनवून सगळ्या सत्तेची सूत्रे स्वत:च्या हाती घेतली…..देशातील सर्व सत्तांना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याच्या कल्पनेचे ते जनक होते ..
यांच्याबाबत म्हणताना कर्नल malleson म्हणतो..
It must never be lost sight of that great dream of Mahadaji Sinde’ss life was to unitew all the nation powers of India in one Great Confedaracy against The English. In this respect he was the most far sighted statesman that India has ever produced…
It was grand idea capable of realization by Mahadaji but by him alone…
महादजींनी पानपताचा कलंक धुऊन काढण्यासाठी अवघे जीवन वेचले..ह्या अगोदर सुद्धा मराठ्यांनी उत्तर हिंदुस्थानात कित्येकवेळा स्वारी केली होती पण कोणीही महादाजीन्सारखे दीर्घकाळ उत्तरेत वास्तव्य केले नाही..महादजींनी उत्तरेत मराठा साम्राज्य स्थिर करून जी दूरदृष्टी दाखवली त्याला तुलना नाही… त्यांच्या ह्या दूरदृष्टीची पुणे दरबाराने नेहमीच अवहेलनाच केली…तसाही त्या तथाकथित मुत्सद्द्यांनी पानपताचा पराभव गंभीरपणे मनाला लावून घेतलाच कुठे होतां.??.पानपतावरील सदाशिवभाऊंचे आणि विश्वासरावांचे रक्त वाळते न वाळते तोच पुणे दरबाराने अब्दालीकडे मैत्रीचा तह केला….
१७६२ च्या शेवटी अब्दालीची एक वकीलात पुण्यास आली तिचा तळ अहमदनगर इथे पडला होता..त्यांची पुणे दरबाराने उत्तम बडदास्त ठेवली.. तिची व्यवस्था अजून चांगली व्हावी म्हणून पेशव्यांनी गणेश विठ्ठल ह्यांच्या नावे सनदा काढल्या:
” गणेश विठ्ठल यांचे नावे सनद कि गुलराज व आनंदाराम वकील दिमत अब्दाली यांचाकडील उन्ते व घोडी व बैल किल्ले अहमदनगर येथे ठेवले आहेत.. त्यास दररोज लाकडे वजन पक्के गावात पाळले सुमार २०० एकूण वजन पक्के आदमन व गावात पाळले दोनशे याप्रमाणे दररोज सनद पैवस्तीगीरीपासून दहा ते पंधरा रोजपर्यंत देणे
सनद १

(सातारा महाराज व पेशवा दैनंदिनी )

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment

Books on Shri Shivaji Maharaj

शिवाजी महाराजांच्या वरील पुस्तकांची यादी

1. Marathi Riyasat : Shahaji Raje Bhosale G.S.Sardesai.
2. Marathi Riyasat : Shak Karta Shivaji G.S.Sardesai.
3. Shri Shivchhatrapati T.S.Shejavalkar
4. Chhatrapati Shivaji Maharaj V.C.Arvind Bendre
5. Maratha -Swaraj-Sansthapak Shri Shivaji Maharaj C.V.Veidya
6. Maratha samrajya R.V.Oturkar
7. Mahan Bandakhor ( Grand Ribel Denis Kinked) Bhagavant Deshmukh
8. Shivarayashi Aathavave( Sanyukat Vevasthapan Mandal,Mumbai) Government Press
9. Marathishahi Aadi-anta or culture Ithihas shastra Aprabudha
10. Jayram Pindekrut RadhaMadhavVilasChanpu:Shahaji Maharaj V.K.Rajwade
11. Itihasik Prastavana V.K.Rajwade
12. Shivaji Nibandhavali ( Part one and two ) Shivacharitra Office Pune
13. Maharashtra Itihas L.K.Chipalunkar
14. Punyashalok Chhatrapati Shivaji Balshastri Hardas
15. Shivaji Rajniti B.V.Bhat
16. Chhatrapati Shivaji Maharaj D.V.Kale
17. Chatriya Kulvant Chhatrapati Shivaji Maharaj Charitra K.A.Keluskar
18. Hinavi swaraj and Mugal Madhavrao Pagadi
19. Dagalbaj Shivaji K.C.Thakare
20. Marathi Riyasat : Stirabudhi Rajaram G.S.Sardesai
21. Aray Virangana K.B.Dongare
22. Shak Karte Shri Shiv Chhatrapati Maharaj 7 episode Charitra (Malhar Ramrao Chitnis ) R.V.Herwadkar
23. Shiv Charitra- Ek study Madhavrao Pagadi
24. Maratha Bakhar ( Grant daf ‘History of the Maratha’s ‘) Devid Kepan 25. Shivputra Sambhaji Kamal Gokhale
26. Marathe and Engraj N.C.Kelkar
27. Pratapgad war G.V.Modak
28. Rajwade Laxmanshastri Joshi
29. Aarvachin Maharashtrakalatil
Rajyakarbharacha study S.N.Joshi 30. Shri Chhatrapati Rajaram Maharaj
V.S.Bendre
31. Marathe and Aurangjeb Madhavrao
Pagadi
32. Mugal-Maratha sangharsha ( Pharashi)
Madhavrao Pagadi 33. Mugal-Marathe ( Tarikhe dilkusha)
Madhavrao Pagadi
34. Maratha swatantryayudha Madhavrao
Pagadi
35. Maratha Itihas Lectures N.R.Pathak
36. Chhatrapati Sambhaji Maharaj V.C.Bendre
37. Aval Marathshahi antaswaroop
G.C.Sardesai
38. Shri Shahaji Raje Bhosale Shidhar
Telkar
39. Sanadpatre Mavaji,Parasnis 40. Marathi sattecha Utkarsha(M.G.Ranade
Rise of Maratha Power) N.R.Pathak
41. Maratha Itihas sadhane (Portugij
Bragans Parera) S.S.Desai
42. Shri Shivrayanchi Agra Garudzep
G.D.Savarkar 43. Shivaji and Chandrao More C.V.Vedya
44. Shri Shiv Chhatrapati 91 Kalmi Bakhar
V.S.Vakaskar
45. Chhatrapati Shri Shivaji Raje Bakhar
(Krushnaji Anant) S.N.Joshi
46. Shiv Kalin -Letters collection Shivcharitra office
47. Portugij Marathe history P.S.Pisurlekar
48. Shivaji and shivyug Sadashiv Athwale
49. Maratha uday and utkarsha
P.N.Deshpande
50. Shivaji avtar karya S.R.Sunthankar 51. Adnyapatra ( Ramchandrapant
Amataya) V.D.Rao
52. Vatanpatre Nivadepatre Mavaji &
Parasnis
53. Shri Shiv Digvijay P.R.Nandurbarkar &
L.K.Dandekar 54. Maratha Patrarup Itihas D.V.Apate and
R.V. Oturkar
55. Yugpravartak Shivaji Maharaj V.K.Bhave
56. Sardesai Smarak Grantha S.R.Tikekar
57. Raygad Jivankatha S.V.Aavalaskar
58. Shivabharat (Parmanand) S.M.Divekar 59. Maharashtra History Manjiri Dattopant
Apate
60. Tukaram Darshan G.B.Sardar
61. Santavandmaya Phalshruti G.B.Sardar
62. Santkavi Tukaram Nirmalkumar
Phadakule 63. Shri Samartha Charitra N.R.Pathak
64. Prachin Marathi Vandmaya itihas
A.N.Deshpande
65. Prachin Marathi Vandmaya itihas
L.R.Nashirabadkar
66. Maharani Tarabai Jayashigrao Pawar

Books in English -

1. Shivaji and his Times Jadunath Sarkar
2. House of Shivaji Jadunath Sarkar
3. Chhatrapati Shivaji Madhavrao Pagadi
4. Maratha Mugal relations 1680-1707
Madhavrao Pagadi 5. History of the Marattas James Grant Duff
6. New History of the Marattas G.S.Sardesai
7. The rise of the Maratha Power
S.L.Karandikar
8. Shivaji-a study in Leadership Jadunath
Sarkar 9. Shivaji The Pragmatist K.L.Mahaley
10. Shivaji the Great Bal Krishna
11. Administrative system of the Maratah’s
S.N.Sen
12. The founding of Maratha Freedom
S.K.Sharma 13. The Deliverance or the Escape of Shivaji
-the Great from Agra G.K.alias Baba Saheb
Deshpane
14. Shivaji S.V.Raddi

१) फार्सी पत्र संग्रह
१-अ) आदाब – इ – आलमगीरी (आलमगिरी शैली)
१-ब) इन्शा -इ हफ्त अंजुमन (सात प्रकारची पत्रे)
१- क) दुर्ज – उल गवाहिर (रत्नांचा करंडा)
१-ड) खुतूत – इ- शिवाजी (शिवरायांची पत्रे)

२) मराठी
२-अ) मराठ्यांच्या इतिहासाची साधने
(वि. का. राजवाडे संपादित खंड ८,१५, १६, १७,१८, २०)
२-ब) सभासद बखर (कृष्णाजी अनंत सभासद)
२-क) ९६ कलमी बखर
२-ड) चित्रगुप्त बखर
२- इ) तंजावरचा शिलालेख
२-फ) चिटणीस बखर
२-ह) शिवदिग्वीजय बखर
* शकावल्या
*-अ) जेधे शकावली
*-ब) शिवापूरकर देशपांडे शकावली
*-क) शिवापूर शकावली
*-ड) चित्रे शकावली

३) पोर्तुगीज
३-अ) द पोर्च्युगीझ अँड द मराठाज (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-ब) मराठ्यांच्या इतिहासाची साधने : पोर्तुगीज दप्तर (डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर)
३-क) कोस्मि द ग्वार्दलिखित शिवचरित्र (१६९५)

४) इंग्रजी
४-अ) दि इंग्लिश फॅक्टरीज इन इंडिया, १७ खंड
४-ब) इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, २ खंड

५) फार्सी साहित्य
५-अ) बादशाहनामा/ पातशाहनामा (शाहजहान कारकिर्द – १६२८ ते १६४७)
५-ब) आलमगिरनामा (औरंगजेबाची कालकिर्द)
५-क) मुहंमदनामा (मुहम्मद आदिलशाहाची कालकिर्द)
५-ड) तारीख – इ – आदिलशाही (आली आदिलशाहाचा इतिहास)

६) संस्कृत
६-अ) अनुपुराण उर्फ शिवभारत (कविंद्र परमानंद)
६-ब) पर्णालपर्वतग्रहणाख्यान (जयराम)
६-क) शिवराजराज्याभिषेककल्पतरू (गोविंद नारायण बर्वे)

७) समकालीन पोवाडे
७- अ) यमाजीकृत बाजी पासलकरांचा पोवाडा
७- ब) अज्ञानदासकृत अफजलखानवधाचा पोवाडा
७- क) फतनजीकृत अफजलखानाचा पोवाडा
७- ड) अज्ञान यमाजी कृत दत्ताजी जाधवरावांचा पोवाडा

८) हिंदी
८ -अ) शिवभूषण (कवि भूषण)
८ -ब) शिवा बावनी (कवि भूषण)

1. Vedh mahamanavacha- shrinivaas samant(with each and every reference)
2. Shivray ani shivkalin sandharbha
3. Yudh ek kala- capt. Raja limaye

संदर्भ -
- श्री शिवभारत – कवींद्र परमानंद
- जेधे शकावली – करीना
- शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १
- शिवचरित्रवृत्त संग्रह – ग.ह.खरे आणि श.ना.जोशी
- शिवचरित्र एक अभ्यास -सेतूमाधवराव पगडी
- तारीख – ए – दिलकुशा- भीमसेन सक्सेना
- असे होते मोगल -निकोलाय मानुची
- सभासद बखर
- ९१ कलमी बखर
- मुंतखबउललुबाब – खाफीखान

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Share and Enjoy

 • Facebook
 • Twitter
 • Delicious
 • Digg
 • StumbleUpon
 • Add to favorites
 • Email
 • RSS
Posted in Uncategorized | Leave a comment